समस्तचित्रकार्यान्तर्गर्भिणी शिंबिकाकृतिः ।
स्वरूपाह्लादनिर्मुक्तिरहितेच्छोदयोद्गमः ॥१३॥
samastacitrakāryāntargarbhiṇī śiṃbikākṛtiḥ |
svarūpāhlādanirmuktirahitecchodayodgamaḥ
(ती इच्छा) शिंबिकेच्या (शेंगेच्या) आकृतीसारखी, समस्त चित्र (विविध) कार्यांनी आतून गर्भिणी (गाभा धरलेली) असते; इच्छेच्या उद्गमाचा तो उदय स्वरूपाच्या आह्लादापासून (शिवाच्या निजानंदापासून) निर्मुक्त (विभक्त) नसतो.