घटो नश्यत्यात्मनेति किंचित्कुर्वन् किमात्मना ।
नश्यत्यात्मन्यकुर्वन् वा तदेवं स्थित एव सः ॥६०॥
ghaṭo naśyatyātmaneti kiṃcitkurvan kimātmanā |
naśyatyātmanyakurvan vā tadevaṃ sthita eva saḥ
(तू म्हणतोस) 'घट स्वतःहूनच नष्ट होतो.' (पण) तो आपल्या स्वस्वरूपाशी काही करत नष्ट होतो, की स्वस्वरूपाशी काही न करता? जर (तो) काही न करता (नष्ट होतो), तर तो तसाच (अबाधित) स्थित राहतो.