दृष्टान्तेऽपि हि सादृश्ये प्रत्यक्षेण क्षणग्रहः ।
दीपज्वालासमूहेषु कम्पनं न विनाशिता ॥५६॥
dṛṣṭānte'pi hi sādṛśye pratyakṣeṇa kṣaṇagrahaḥ |
dīpajvālāsamūheṣu kampanaṃ na vināśitā
(सादृश्यासाठी दिलेल्या) दृष्टान्तातही (दीपज्वालेतही) प्रत्यक्षाने क्षणांचे (वेगवेगळे) ग्रहण (होत नाही); दीपज्वालांच्या समूहांत (केवळ) कंपन (थरथर) असते, नाश (नाश पावून पुन्हा उत्पन्न होणे) नव्हे.