यत्सत्तत्क्षणिकत्वेऽपि सत्त्वमप्यक्षगोचरं ।
सादृश्याद्भ्रान्तमक्षं चेददुष्टं प्राग्ग्रहे यथा ॥५५॥
yatsattatkṣaṇikatve'pi sattvamapyakṣagocaraṃ |
sādṛśyādbhrāntamakṣaṃ cedaduṣṭaṃ prāggrahe yathā
(ते म्हणतात) 'जे सत् ते क्षणिक'; तरी त्यांच्या क्षणिकत्वावरही, सत्त्व (अस्तित्व) इंद्रियगोचर आहे (इंद्रिये स्थैर्य ग्रहण करतात). जर (तू म्हणालास) इंद्रिय सादृश्यामुळे भ्रांत (झालेले) — तर ते पूर्वीच्या ग्रहणातही (तसेच) अदुष्ट (निर्दोष) होते.