भावस्य भावजनने युक्तत्वं न क्षणस्थितेः ।
न घटाद्घटसम्भूतिः समवायाद्यपेक्षया ॥५३॥
bhāvasya bhāvajanane yuktatvaṃ na kṣaṇasthiteḥ |
na ghaṭādghaṭasambhūtiḥ samavāyādyapekṣayā
(क्षणिकवाद्याच्या क्षणस्थितीच्या मतात) सत् वस्तूचे (दुसरी) वस्तू उत्पन्न करणे सुसंगत होत नाही; आणि (वास्तववाद्याच्या मते) घटापासून घटाची उत्पत्ती (होत) नाही, कारण (त्याला) समवाय इत्यादींची अपेक्षा (असते, जी क्षणिकवादी नाकारतो).