नच शुद्धस्य बाह्यार्थाभासता चेदविद्यया ।
वासनारूपया शुद्धे नाशुद्धा वासना भवेत् ॥४०॥
naca śuddhasya bāhyārthābhāsatā cedavidyayā |
vāsanārūpayā śuddhe nāśuddhā vāsanā bhavet
आणि शुद्ध (ज्ञाना)ला बाह्यार्थाभासता (बाहेरील वस्तूसारखे भासणे, मानता येत) नाही; कारण जर (तू म्हणालास ते) वासनारूप अविद्येने (होते) — तर शुद्ध (ज्ञाना)त अशुद्ध वासना (संस्कार) असूच शकत नाही.