पृथक्त्वमीश्वरस्यास्ति सर्वात्मभ्यः पृथक्कुतः ।
न्यायवैशेषिकाणां तु बन्धमोक्षौ पृथक्स्थिती ॥२८॥
pṛthaktvamīśvarasyāsti sarvātmabhyaḥ pṛthakkutaḥ |
nyāyavaiśeṣikāṇāṃ tu bandhamokṣau pṛthaksthitī
(त्यांच्या मते) ईश्वराचे सर्व आत्म्यांपासून पृथक्त्व (वेगळेपण) आहे — परंतु असे पृथक्त्व कुठून (येईल)? आणि न्याय-वैशेषिकांच्या मते बंध आणि मोक्ष या पृथक् (वेगवेगळ्या) अवस्था म्हणून स्थित आहेत.