रूपद्वयं युक्तिमत्स्याज्जन्मादेर्युगपन्न च ।
सम्भवः स्यात्तथारूपशिवत्वादन्यदर्शने ॥११६॥
rūpadvayaṃ yuktimatsyājjanmāderyugapanna ca |
sambhavaḥ syāttathārūpaśivatvādanyadarśane
(पुरे व अपुरे असे) रूपद्वय (दोन रूपे) एकाच वेळी युक्तिसंगत होईल का? — आणि जन्म इत्यादींची एकाच वेळी (एकाच गोष्टीत) उत्पत्ती अन्य दर्शनात संभवणार नाही; (आमच्या मते ती जुळते,) कारण (प्रत्येक वस्तू) तशाच रूपाचा शिवच आहे (जसे ती दिसते).