दुःखादिना विशेषश्चेत् तत्राप्यशिवता नच ।
दुःखेऽपि प्रविकासेन दुःखार्थे धृतिसंगमात् ॥९॥
duḥkhādinā viśeṣaścet tatrāpyaśivatā naca |
duḥkhe'pi pravikāsena duḥkhārthe dhṛtisaṃgamāt
जर (तू म्हणालास) दुःख इत्यादींमुळे भेद (येतो) — तर तिथेही अशिवता (अशिवपणा) नाही; कारण दुःखातही, (चैतन्याच्या) विकासामुळे, खुद्द दुःखाच्या विषयातच (एक प्रकारच्या) धृतीशी (धैर्याशी) संगम होतो.