सूक्ष्मत्वात्तर्ह्यदृश्यत्वमस्पृश्यत्वममूर्तता ।
तैरदृश्यैर्यदारब्धं तत्तथैवाथ संहतेः ॥८५॥
sūkṣmatvāttarhyadṛśyatvamaspṛśyatvamamūrtatā |
tairadṛśyairyadārabdhaṃ tattathaivātha saṃhateḥ
तर मग सूक्ष्मतेमुळे अदृश्यता, अस्पृश्यता — (एका शब्दात) अमूर्तता (तू मान्य करतोस). परंतु त्या अदृश्य (परमाणूं)नी जे रचले (बनवले) ते देखील तसेच (अदृश्य व्हायला हवे) — अथवा (दृश्यता) संहतीमुळे (एकत्र येण्यामुळे होते, जी नवी अडचण उभी करते).