अथ चेच्चिद्वतामेतद्वक्तुं युक्तं कदाचन ।
पृथिव्यादेर्हि मूर्तस्य घटादेर्वा न युज्यते ॥११॥
atha ceccidvatāmetadvaktuṃ yuktaṃ kadācana |
pṛthivyāderhi mūrtasya ghaṭādervā na yujyate
आता जर (कोणी आक्षेप घेईल): हे (इच्छा, आनंद इत्यादींचे आरोपण) चित्वंतांना (जाणीवयुक्तांना) म्हणणे कदाचित योग्य (असेल) — परंतु मूर्त अशा पृथ्वी इत्यादींना, अथवा घट इत्यादींना (म्हणणे) योग्य नाही.