नासंबद्धस्य करणं सत्कार्याच्चेत्स विद्यते ।
सन्नप्यसावसंवेद्यो व्यञ्जकस्याप्यभावतः ॥५०॥
nāsaṃbaddhasya karaṇaṃ satkāryāccetsa vidyate |
sannapyasāvasaṃvedyo vyañjakasyāpyabhāvataḥ
असंबद्ध (वस्तू)चे करण (निर्माण) होत नाही; आणि जर सत्कार्यवादानुसार ते (कार्य) आधीच अस्तित्वात असेल — तर सत् असूनही ही (वस्तू अद्याप) संवेद्य (जाणण्याजोगी) नाही, कारण व्यंजकाचाही (अभिव्यक्त करणाऱ्याचाही) अभाव असतो (— हाच तर आम्ही मांडलेला मुद्दा).