आत्मनः सक्रमत्वं स्यादन्यत्रापरसंगमः ।
किं पूर्वं सक्रमाभूत्सा रूपद्वित्वं प्रसज्यते ॥५१॥
ātmanaḥ sakramatvaṃ syādanyatrāparasaṃgamaḥ |
kiṃ pūrvaṃ sakramābhūtsā rūpadvitvaṃ prasajyate
(तो स्वतःच्या ठायी संहृत झाला म्हणाल तर) तिला स्वतःला सक्रमत्व (क्रमयुक्तता) येईल; दुसरीकडे (म्हणाल तर) अपराशी (अन्याशी) संगम (होईल). की ती पूर्वी सक्रमा (क्रमयुक्त) होती (म्हणाल)? तर रूपद्वित्व (दोन स्वरूपांचा प्रसंग) ओढवतो.