— नाही (हानी); — 'अहं' इत्यादी परामर्शाच्या भेदामुळे; — याचे (परमेश्वराचे); — ज्याचे स्वरूप (स्वतःहून) नेले जात नाही; — 'अहं'ने मृश्य (विमर्शनीय) म्हणूनच; — याच्या (परमेश्वराच्या); — सृष्टीचे; — तिङन्त क्रियापदात अभिप्रेत कर्माप्रमाणे
'अहं' इत्यादी परामर्शाच्या भेदामुळे या (परमेश्वरा)चे स्वरूप स्वतःहून दूर नेले जात नाही (म्हणून स्वातंत्र्यहानी नाही); कारण त्याची सृष्टी 'अहं'ने मृश्य (विमर्शनीय) म्हणूनच (भासते) — तिङन्त क्रियापदात अभिप्रेत कर्माप्रमाणे.