तत्र निम्नासनस्थितेभ्यः तत्परेभ्यो नियमितवाङ्मनःकायेभ्यो व्याख्या क्रियमाणा फलवती भवति प्रथमं गन्धादिलिप्तायां भुवि उल्लिख्य सङ्कल्प्य वा पद्माधारं चतुरश्रं पद्मत्रयं पद्ममध्ये वागीशीं वामदक्षिणयोः गणपतिगुरू च पूजयेत् आधारपद्मे व्याख्येयकल्पदेवताम्
Transliteration (IAST)
tatra nimnāsanasthitebhyaḥ tatparebhyo niyamitavāṅmanaḥkāyebhyo vyākhyā kriyamāṇā phalavatī bhavati prathamaṃ gandhādiliptāyāṃ bhuvi ullikhya saṅkalpya vā padmādhāraṃ caturaśraṃ padmatrayaṃ padmamadhye vāgīśīṃ vāmadakṣiṇayoḥ gaṇapatigurū ca pūjayet ādhārapadme vyākhyeyakalpadevatām
तेथे खालच्या आसनावर बसलेल्या, त्यात तत्पर असलेल्या, वाणी-मन-कायेने नियमित असलेल्यांना केली जाणारी व्याख्या फलवती होते. प्रथम गंधादींनी लिप्त भूमीवर रेखाटून अथवा संकल्पून, पद्माधार चतुरस्र आणि पद्मत्रय (काढून), पद्माच्या मध्यभागी वागीशीची, डाव्या-उजव्या बाजूस गणपती आणि गुरूची, आणि आधारपद्मावर व्याख्येय (ग्रंथाच्या) कल्पदेवतेची पूजा करावी.