प्रापितो जगदैक्यं च समन्तादवकल्पते ।
यत्र तत्रापि विश्रान्तिलीनं शक्तिचतुष्टये ॥४६॥
prāpito jagadaikyaṃ ca samantādavakalpate |
yatra tatrāpi viśrāntilīnaṃ śakticatuṣṭaye
आणि (त्या एकत्वाला) प्राप्त झालेला (साधक असता) जगाचे ऐक्य सर्वत्र (सर्व बाजूंनी) घडून येते; जिथे तिथे (जिकडे पाहावे तिकडे विश्व) शक्तिचतुष्टयात (इच्छा-ज्ञान-क्रिया व त्यांचा आधार या चार शक्तींत) विश्रांतीने लीन झालेले (दिसते).