सामान्याभावतस्तर्हि भवतो नानुमानता ।
सा भविष्यत्यपोहेन सोऽपि केनोपपद्यते ॥७७॥
sāmānyābhāvatastarhi bhavato nānumānatā |
sā bhaviṣyatyapohena so'pi kenopapadyate
तर मग, सामान्याच्या अभावामुळे, तुझ्या (बौद्ध) मते अनुमान नाही. (जर तू म्हणालास) 'ते अपोहाने (व्यावृत्तीने) सिद्ध होईल' — तो (अपोह) तरी कशाने सिद्ध होतो (कारण व्यावृत्ती ज्या वस्तूची ती असते तीच गृहीत धरते)?