सर्वेषामप्यविद्यैव कल्प्या ब्रह्मणि संगता ।
तथा भावेष्वसत्यत्वमित्यवश्यमवस्थितम् ॥१५॥
sarveṣāmapyavidyaiva kalpyā brahmaṇi saṃgatā |
tathā bhāveṣvasatyatvamityavaśyamavasthitam
या सर्वांच्या मते अविद्याच ब्रह्माशी संलग्न (जोडलेली) कल्पावी लागते; आणि त्यामुळे भावांचे (वस्तूंचे) असत्यत्व अपरिहार्यपणे येते (— जे आम्ही नाकारतो, कारण आमच्या मते सर्व काही सत्य शिव आहे).