तद्बुध्नावयवैर्वाथ तेऽपि यान्त्यूर्ध्वतां क्षणात् ।
बुध्नस्तैर्नच सम्बद्धः कदाचिच्चक्षुषो भवेत् ॥४९॥
tadbudhnāvayavairvātha te'pi yāntyūrdhvatāṃ kṣaṇāt |
budhnastairnaca sambaddhaḥ kadāciccakṣuṣo bhavet
अथवा जर (तू म्हणालास अग्नी) धूमाच्या तळातील अवयवांवरून (अनुमानित होतो) — तर तेही क्षणात वर जातात, आणि (अग्नी असलेला) तळ त्यांच्याशी जोडलेला (असा) डोळ्याला कधीही (स्थिर) मिळणार नाही.