इतश्च तेऽपि चिद्वन्तः स्वात्मनि ज्ञानयोगतः ।
स्वयमेव न चेज्ज्ञानमात्मन्येषां प्रजायते ॥२२॥
itaśca te'pi cidvantaḥ svātmani jñānayogataḥ |
svayameva na cejjñānamātmanyeṣāṃ prajāyate
आणि यावरूनही (सिद्ध होते की) तीही (वस्तू) चित्वंत (जाणीवयुक्त) आहेत, आपल्या स्वस्वरूपात ज्ञानाच्या योगामुळे; कारण जर या (वस्तूं)च्या स्वस्वरूपात स्वतःहून ज्ञान उत्पन्न होत नसेल (तर त्या मुळी ज्ञानाचा विषयच होऊ शकणार नाहीत).