कर्तृत्वमुपचाराच्चेत् क्रियाया अप्यसत्यता ।
प्रयोज्यत्वमथोच्येत प्रवृत्तं हि प्रवर्तते ॥१५॥
kartṛtvamupacārāccet kriyāyā apyasatyatā |
prayojyatvamathocyeta pravṛttaṃ hi pravartate
जर (तू म्हणालास) कर्तृत्व केवळ उपचाराने (गौण अर्थाने आरोपित आहे) — तर क्रियाही असत्य (ठरेल). अथवा जर असे म्हटले की (घट) केवळ प्रयोज्य (दुसऱ्याकडून कारवून घेतलेला) आहे — (तरी) जे (आधीच) क्रियेस प्रवृत्त झाले आहे तेच प्रवृत्त होते (म्हणून तो स्वतःच जाणणारा कर्ता असला पाहिजे).