कथं न देवदत्तस्य यज्ञदत्तवदाख्यया ।
अत्र संकेतितत्वाच्चेत् संकेतेनात्र किं कृतम् ॥७७॥
kathaṃ na devadattasya yajñadattavadākhyayā |
atra saṃketitatvāccet saṃketenātra kiṃ kṛtam
(अन्यथा) यज्ञदत्ताप्रमाणेच देवदत्ताचेही नाव (कोणालाही) का लागू होऊ नये? जर (तू म्हणालास) येथे (पूर्व) संकेतामुळे (असे होते) — (तर विचार:) त्या संकेताने येथे (शब्द-अर्थांत) काय (खरा संबंध) घडवला आहे?