नामसंस्थानभेदश्चेद्धस्ते मुष्ट्याद्यभेदिता ।
स्थितमेव हि सत्कार्यमत एवाविनाशिता ॥५३॥
nāmasaṃsthānabhedaśceddhaste muṣṭyādyabheditā |
sthitameva hi satkāryamata evāvināśitā
जर (तू म्हणालास) केवळ नाव आणि संस्थान (आकार) यांचा भेद आहे — (तर पाहा की) हाताच्या बाबतीत मूठ इत्यादी (हातापासून) अभिन्न असतात. अशा प्रकारे सत्कार्य दृढपणे स्थित होते, आणि याच कारणाने (त्याची) अविनाशिता (सिद्ध होते).