असत्त्वे कारकाणं हि समूहो न भवेत्तदा ।
कर्माख्यस्य ह्यसत्यत्वात्तत्संबन्धोऽसता कथम् ॥४६॥
asattve kārakāṇaṃ hi samūho na bhavettadā |
karmākhyasya hyasatyatvāttatsaṃbandho'satā katham
कारण जर (कार्य) असत् असेल, तर त्या वेळी कारकांचा समूहच जमणार नाही — कारण कर्म (कर्माख्य) नावाचे (कारक) असत्य ठरेल, आणि असत् वस्तूशी (इतर कारकांचा) संबंध तरी कसा होईल?