ज्ञानशक्तिस्तदर्थं हि योऽसौ स्थूलः समुद्यमः ।
सा क्रियाशक्तिरुदिता ततः सर्वं जगत्स्थितम् ॥२१॥
jñānaśaktistadarthaṃ hi yo'sau sthūlaḥ samudyamaḥ |
sā kriyāśaktiruditā tataḥ sarvaṃ jagatsthitam
त्या (कार्या)साठी जो हा स्थूल समुद्यम (उद्योगाचा उठाव) असतो ती ज्ञानशक्ती; आणि त्यानंतर उदित होणारी ती क्रियाशक्ती होय. त्या (शक्तित्रयातून)च सर्व जग स्थित आहे.