नैवं शुद्धस्थलज्ञानात् सिद्ध्येत् तस्याघटात्मना
न तूपलब्धियोग्यस्याप्य् अत्राभावो घटात्मनः ॥८॥
naivaṃ śuddhasthalajñānāt siddhyet tasyāghaṭātmanā
na tūpalabdhiyogyasyāpy atrābhāvo ghaṭātmanaḥ
— असे नाही; — शुद्ध भूतलाच्या ज्ञानावरून; — सिद्ध होईल; — त्याचे (भूतलाचे); — अघटस्वरूप म्हणून; — परंतु नाही; — उपलब्धियोग्य (दृश्य) (वस्तू)चा; — सुद्धा; — येथे; — अभाव; — घटस्वरूप (वस्तू)चा
(उत्तर:) असे नाही. शुद्ध भूतलाच्या ज्ञानावरून केवळ त्याचे अघटस्वरूप सिद्ध होईल; परंतु उपलब्धियोग्य (दृश्य) अशा घटस्वरूप वस्तूचा अभाव येथे (त्यावरून सिद्ध) होत नाही.