— त्याचे; — ज्याचे स्वरूप ऐश्वर्य आहे; — पशुभावात (बद्ध अवस्थेत); — प्रकट करणारी; — विद्याशक्ती; — तिरोधान (आच्छादन) करणारी; — मायानामक; — मात्र (दुसरीकडे)
ज्याचे स्वरूप ऐश्वर्य आहे त्याचे ते (ऐश्वर्य) पशुभावात (बद्ध अवस्थेत) प्रकट करणारी ती विद्याशक्ती; आणि तिरोधान (आच्छादन) करणारी ती मात्र मायानामक (शक्ती).