वास्तवे ऽपि चिदेकत्वे न स्याद् आभासभिन्नयोः
चिकीर्षालक्षणैकत्वपरामर्शं विना क्रिया ॥२०॥
vāstave 'pi cidekatve na syād ābhāsabhinnayoḥ
cikīrṣālakṣaṇaikatvaparāmarśaṃ vinā kriyā
— वास्तविक; — सुद्धा; — चैतन्याचे एकत्व असता; — असणार नाही; — आभासाने भिन्न झालेल्या दोहोंची; — चिकीर्षा (कृतीची इच्छा) हे लक्षण असलेल्या एकत्व-परामर्शा; — वाचून; — क्रिया
चैतन्याचे वास्तविक एकत्व असले तरीही, आभासाने भिन्न झालेल्या त्या दोहोंची (कारण-कार्याची) क्रिया, चिकीर्षा (कृतीची इच्छा) हे लक्षण असलेल्या एकत्व-परामर्शावाचून (शक्य) नाही.