व्याप्तिदार्ढ्ये नक्तमेकं चन्द्रं वात्मानमुत्थितम् ।
विचिन्त्य प्रस्रवन्तं के कस्याप्याप्यायनं भवेत् ॥७५॥
vyāptidārḍhye naktamekaṃ candraṃ vātmānamutthitam |
vicintya prasravantaṃ ke kasyāpyāpyāyanaṃ bhavet
व्याप्तीच्या दार्ढ्यात (पकड दृढ झाली असता), रात्री स्वतःला एकमेव उगवलेला चंद्र म्हणून, कोणाच्या तरी मस्तकावर (अमृत) पाझरत असलेला असा चिंतल्यावर, त्याचे आप्यायन (पोषण, कल्याण) होईल (हे आप्यायनाचे कर्म).