प्रतिबिम्बतया चान्ये ये वा सर्गमुखे स्वयम् ।
ब्रह्मैव गृह्णात्यात्मानं ततो भेदोपपादनम् ॥११॥
pratibimbatayā cānye ye vā sargamukhe svayam |
brahmaiva gṛhṇātyātmānaṃ tato bhedopapādanam
आणि इतर (हे) प्रतिबिंबाच्या रूपाने (समजावतात); अथवा (काही असे आहेत की त्यांच्या मते) सृष्टीच्या आरंभी ब्रह्म स्वतःहूनच स्वतःला ग्रहण करते, आणि त्यातून भेदाची सिद्धी (होते).