घटादीनां समस्तानामिच्छादेरल्पतास्ति चेत् ।
अन्यत्र देहे सर्पादौ दीपादौ नाग्निताल्पके ॥७॥
ghaṭādīnāṃ samastānāmicchāderalpatāsti cet |
anyatra dehe sarpādau dīpādau nāgnitālpake
जर (तू आक्षेप घेतलास की) घट इत्यादी सर्वांमध्ये, (देहात, सर्पात इत्यादी) इतरत्र (असलेल्या पूर्णतेच्या तुलनेत) इच्छा इत्यादींची अल्पता असते — (तर आम्ही म्हणतो की) दिवा इत्यादींमध्ये लहान (ज्योतीत) अग्नित्व कमी होत नाही.