ततोऽप्येतच्छिवात्मत्वं भावानामुपपद्यते ।
तथार्थावगतिर्वाक्यात्पदाद्वा नोपपद्यते ॥९६॥
tato'pyetacchivātmatvaṃ bhāvānāmupapadyate |
tathārthāvagatirvākyātpadādvā nopapadyate
त्यावरूनही भावांचे हे शिवात्मत्व सिद्ध होते; त्याचप्रमाणे वाक्यापासून अथवा पदापासून अर्थाचे ज्ञान (एकीकरण करणाऱ्या चैतन्याशिवाय) संभवणार नाही.