यथा सर्वपदार्थानां भगवच्छिवरूपता ।
तद्वद्वागिन्द्रियस्यापि न पुनः सा परा दशा ॥८८॥
yathā sarvapadārthānāṃ bhagavacchivarūpatā |
tadvadvāgindriyasyāpi na punaḥ sā parā daśā
ज्याप्रमाणे सर्व पदार्थांच्या ठायी भगवान् शिवाची रूपता (असते), त्याप्रमाणे वागिंद्रियाच्या (वाणीच्या इंद्रियाच्या) ठायीसुद्धा (ती शिवरूपता असते); परंतु ती (वाणी) म्हणजे परा दशा (श्रेष्ठ अवस्था) नव्हे.