तस्मादसाधुः साधुः स्याच्छब्दविद्याफलप्रदः ।
एवं व्याकरणस्यापि समुच्छेद उपैति ते ॥७१॥
tasmādasādhuḥ sādhuḥ syācchabdavidyāphalapradaḥ |
evaṃ vyākaraṇasyāpi samuccheda upaiti te
म्हणून (तुमच्या मते) असाधु (अशुद्ध) शब्दही साधु (शुद्ध) ठरून शब्दविद्येचे फळ देणारा होईल; अशा रीतीने तुमच्या व्याकरणाचाही समुच्छेद (समूळ नाश) ओढवतो.