pramātari purāṇe tu sarvadā bhātavigrahe
kiṃ pramāṇaṃ navābhāsaḥ sarvapramitibhāgini
— प्रमात्याविषयी; — पुराण (आदिम); — परंतु; — सदैव; — ज्याचा विग्रह (स्वरूप) भासमान; — कोणता?; — प्रमाण; — नवा आभास; — सर्व प्रमितींत (ज्ञानांत) भाग घेणाऱ्या
— परंतु पुराण (आदिम), ज्याचा विग्रह (स्वरूप) सदैव भासमान, आणि सर्व प्रमितींत (ज्ञानांत) भाग घेणाऱ्या अशा त्या प्रमात्याविषयी, कोणता नवा आभास प्रमाण (सिद्धीसाधन) होईल?