द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः ।
दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदृ ग्लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् ॥
११-२० ॥
dyāvāpṛthivyoridamantaraṃ hi vyāptaṃ tvayaikena diśaśca sarvāḥ |
dṛṣṭvādbhutaṃ rūpamugraṃ tavedṛ glokatrayaṃ pravyathitaṃ mahātman ||
11-20 ||
हे महात्मन्, स्वर्ग व पृथ्वी यांच्यामधील हे अंतराळ व सर्व दिशा एकट्या तुझ्याने व्याप्त झाल्या आहेत; तुझे हे अद्भुत व उग्र रूप पाहून त्रिलोक व्यथित झाले आहेत.