evam evarthasiddhiḥ syān mātur arthakriyārthinaḥ
bhedābhedavatārthena tena na bhrāntir īdṛśī
— अशाच रीतीने; — अर्थसिद्धी (इष्ट प्राप्ती); — होईल; — प्रमात्याला; — अर्थक्रियेची इच्छा करणाऱ्या; — भेद-अभेदयुक्त; — अर्थाने; — म्हणून; — नाही; — भ्रांती; — अशा प्रकारची
अशाच रीतीने अर्थक्रियेची इच्छा करणाऱ्या प्रमात्याला, भेद-अभेदयुक्त अशा अर्थाने, अर्थसिद्धी (इष्ट प्राप्ती) होते; म्हणून (विरोध्याने सांगितलेली) तशी कोणतीही भ्रांती नाही.