एवं स्थिते उत्तराभिमुखम् उपविश्य देहपुर्यष्टकादौ अहम्भावत्यागेन देहतां दहेत् सन्निधाव् अपि परदेहवत् अदेहत्वात् ततो निस्तरङ्गध्रुवधामरूढस्य दृष्टिस्वाभाव्यात् या किल आद्या स्पन्दकला सैव मूर्तिः तदुपरि यथोपदिष्टयाज्यदेवताचक्रन्यासः प्राधान्येन च इह शक्तयो याज्याः
Transliteration (IAST)
evaṃ sthite uttarābhimukham upaviśya dehapuryaṣṭakādau ahambhāvatyāgena dehatāṃ dahet sannidhāv api paradehavat adehatvāt tato nistaraṅgadhruvadhāmarūḍhasya dṛṣṭisvābhāvyāt yā kila ādyā spandakalā saiva mūrtiḥ tadupari yathopadiṣṭayājyadevatācakranyāsaḥ prādhānyena ca iha śaktayo yājyāḥ
असे असता, उत्तराभिमुख बसून, देह, पुर्यष्टक आदींमधील अहंभावाच्या त्यागाने देहत्व जाळून टाकावे; कारण ते (देह) सन्निध असूनही, दुसऱ्याच्या देहासारखे, त्याच्यासाठी अदेह (देहरहित) आहे. नंतर निस्तरंग व ध्रुव अशा धामात आरूढ झालेल्याला, दृष्टीच्या स्वाभाविकतेमुळे, जी आद्य स्पन्दकला आहे तीच मूर्ती (आसन) होय; तिच्यावर पूर्वी सांगितल्याप्रमाणे याज्य देवताचक्राचा न्यास (करावा). आणि येथे प्रामुख्याने शक्तीच याज्य आहेत.