यस्मिन्नर्थे सदात्यागो गच्छतस्तिष्ठतोऽपिवा ।
धावतः खादतो वापि स योगः परयोगिनः ॥८१॥
yasminnarthe sadātyāgo gacchatastiṣṭhato'pivā |
dhāvataḥ khādato vāpi sa yogaḥ parayoginaḥ
ज्या कोणत्याही अर्थाविषयी (विषयाविषयी) — चालत असता, उभे राहत असता, धावत असता, अथवा खात असतानाही — ('मी शिव आहे' या निश्चयाचा) सदा अत्याग (निरंतर न सोडणे), तोच परयोग्याचा (श्रेष्ठ योग्याचा) योग होय.