ननु सो ऽपि अब्रुवन् विपरीतं वा ब्रुवन् किं न त्याज्यः नैव इति ब्रूमः तस्य हि पूर्णज्ञानत्वात् एव रागाद्यभाव इति अवचनादिकं शिष्यगतेनैव केनचित् अयोग्यत्वानाश्वस्तत्वादिना निमित्तेन स्यात् इति तदुपासने यतनीयं शिष्येण न तत्त्यागे
Transliteration (IAST)
nanu so 'pi abruvan viparītaṃ vā bruvan kiṃ na tyājyaḥ naiva iti brūmaḥ tasya hi pūrṇajñānatvāt eva rāgādyabhāva iti avacanādikaṃ śiṣyagatenaiva kenacit ayogyatvānāśvastatvādinā nimittena syāt iti tadupāsane yatanīyaṃ śiṣyeṇa na tattyāge
शंका — तो (पूर्णज्ञानी गुरु) न शिकवत असेल वा विपरीत शिकवत असेल, तर तो त्याज्य ठरत नाही काय? आम्ही म्हणतो — मुळीच नाही. कारण त्याच्या पूर्णज्ञानत्वामुळेच त्याच्यात रागादींचा अभाव असतो; म्हणून त्याचे न शिकवणे इत्यादी हे शिष्याच्याच ठायी असलेल्या एखाद्या अयोग्यत्व, अनाश्वस्तत्व आदी निमित्तामुळे असते. म्हणून शिष्याने त्याच्या उपासनेत प्रयत्न करावा, त्याच्या त्यागात नव्हे.