सर्वमस्मीति रुचिरं रूपमात्मनि चिन्तयन् ।
अहमेव मत्परो न भवेदाकर्षणक्रमः ॥७१॥
sarvamasmīti ruciraṃ rūpamātmani cintayan |
ahameva matparo na bhavedākarṣaṇakramaḥ
'मी सर्व आहे' अशा (भावनेने) स्वतःच्या ठायी रुचिर (तेजस्वी) रूप चिंतणारा, 'मीच (एकटा सर्व आहे)' (असे जाणणारा मत्पर — माझ्यात लीन झालेला) — त्याला आकर्षणाचा क्रम (सर्व वस्तू स्वतःकडे ओढण्याची प्रक्रिया) घडणार नाही का?