Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 3.30 / 48

Bhagavad Gītā (Kashmirian recension)3.30

3.30
मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा । निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥ ३-३० ॥
mayi sarvāṇi karmāṇi saṃnyasyādhyātmacetasā | nirāśīrnirmamo bhūtvā yudhyasva vigatajvaraḥ || 3-30 ||
— माझ्या ठायी सर्व कर्मे ; — अध्यात्मचित्ताने अर्पण करून ; — फलाशारहित व ममतारहित होऊन ; — संताप सोडून युद्ध कर

अध्यात्मचित्ताने सर्व कर्मे माझ्या ठायी अर्पण करून, निराश (फलाशारहित) व ममतारहित होऊन, ज्वर (मानसिक संताप) सोडून युद्ध कर.