स्थिता शिष्यप्रशिष्याद्यैर्विस्तीर्णा मठिकोदिता ।
तदेवमेतद्विहितं मया प्रकरणं मनाक् ॥१२२॥
sthitā śiṣyapraśiṣyādyairvistīrṇā maṭhikoditā |
tadevametadvihitaṃ mayā prakaraṇaṃ manāk
शिष्य, प्रशिष्य इत्यादींनी विस्तीर्ण (विस्तारलेली), स्थिर अशी (त्र्यम्बक नावाची) मठिका (गुरुपरंपरेची मठी) उदित (प्रसिद्ध) झाली. तर असे हे प्रकरण मी संक्षेपाने रचले आहे.