सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।
अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥
१०-३२ ॥
sargāṇāmādirantaśca madhyaṃ caivāhamarjuna |
adhyātmavidyā vidyānāṃ vādaḥ pravadatāmaham ||
10-32 ||
हे अर्जुना, सृष्टींचा आदी, अंत आणि मध्यही मीच आहे; विद्यांमध्ये अध्यात्मविद्या आणि वाद करणाऱ्यांमध्ये (न्याय्य) वाद (मी आहे).