अनुवृत्तिः किमाधिक्याद्रागाद् वा तर्हि दूषणम् ।
अनादिशिवतत्त्वस्य स्वामोदं किं न विद्यते ॥१११॥
anuvṛttiḥ kimādhikyādrāgād vā tarhi dūṣaṇam |
anādiśivatattvasya svāmodaṃ kiṃ na vidyate
(आक्षेप:) ही (शिवाची) अनुवृत्ती (सतत प्रवृत्ती) आधिक्यामुळे (श्रेष्ठतेमुळे) का रागामुळे (आसक्तीमुळे आहे)? — तर मग (तो) दोष ठरेल. (उत्तर:) अनादि शिवतत्त्वाला स्वतःचा आमोद (स्वाभाविक आनंद) नसतो का (— जो खेळात रमतो, कोणत्याही दोषावाचून)?